"भाजपला गाडल्याशिवाय राहणार नाही", संजय राऊत यांचा इशारा

Update: 2022-01-24 06:27 GMT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसैनिकांशी संवाद साधत भाजपवर जोरदार हल्ला केला. त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा वार केला आहे. उद्धव ठाकरे काल जनतेसमोर आले, ते बोलतायत हे पाहूनच विरोधकांचे धाबे दणाणलेले आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. भाजपच्या विरोधात शिवसेनेनं आता महाराष्ट्राच्या बाहेरही लढायचं ठरवलं आहे, कदाचित लगेच यश मिळणार नाही, पण उद्या नक्की यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपनं ईडी, आयटी, सीबीआयची वर्दी उतरवून मैदानात यावं त्यांना गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे.


Full View

Tags:    

Similar News