धनुष्य बाण कोणाचा? निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटाकडून माहिती सादर…

राज्याच्या निवडणूक आयोगाकडे शिवसेनेतील ठाकरे गट विरुध्द शिंदे गट वाद पोहचला आहे. तर निवडणूक आयोगाने 8 ऑगस्ट पर्यंत दोन्ही बाजूंकडे कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र यापुर्वी झालेल्या सुनावणीवेळी ठाकरे गटाने कागदपत्र सादर केले नसल्याचे म्हटले होते. मात्र आता अखेर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे सबमिशन केले आहे.

Update: 2022-08-08 06:58 GMT

राज्याच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तर हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यासंदर्भात शिवसेना 12 ऑगस्ट रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभुमीवर शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सत्यमेव जयते असं म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सुनावणी सुरू आहे. तसंच अनिल देसाईः सबमिशन घ्या असे कोर्टानं निवडणूक आयोगाला सांगितले होते. त्यानुसार ठाकरे गटाकडून महत्वाची कागदपत्रं आणि दस्तावज निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. त्यामुळे शिवसेनेमार्फत पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आलेली शपथ पत्रही निवडणूक आयोगाला सादर केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र राज्य सरकारचा फैसला होणार आहे. मात्र शिवसेनेतील ठाकरे गटाने आता निवडणूक आयोगाकडे दस्तावेज सादर केला आहे. मात्र हा दस्तावेज सादर करताना प्रचंड गुप्तता पाळली आहे. दरम्यान या प्रकरणावर निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात ही प्रक्रिया कुठवर जाते यावर सर्व काही अवलंबून आहे, असं देसाई म्हणाले.

अनिल देसाई यावेळी म्हणाले की, रिप्रजन्टेशन ॲक्ट नुसार सर्व नियंमांचे पालन केले आहे. तसेच विधीमंडळ आणि पक्ष यांची कार्यपद्धती वेगळी आहे. त्यामुळे सत्यमेव जयते असं म्हणत आम्हाला न्याय मिळेल, असंही देसाई म्हणाले.

अनिल देसाई बिहार सरकार कोसळणार का? यावर बोलताना म्हणाले की, नितीश कुमार यांच्या संदर्भात त्यांना दिलेली वागणूक असेल. त्यामुळे ते निर्णय घेत असतील.

Tags:    

Similar News