गोव्यात भाजपला मोठा धक्का? संजय राऊत यांचे स्पष्ट संकेत

Update: 2022-01-17 06:00 GMT

गोव्यामधील विधानसभा निवडणूक यंदा रंगतदार झाली आहे, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या एन्ट्रीने इथले राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनेही गोव्यात निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मनोहर पर्रीकर यांच्याशिवाय भाजप गोव्यात पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनीही आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. आपल्याला भाजपकडून तिकीट मिळावे अशी त्यांची मागणी आहे. पण कोण कुणाचा मुलगा आहे हे पाहून भाजपमध्ये उमेदवारी दिली जात नाही, अशी भूमिका गोव्याचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्यामुळे भाजपने उमेदवारी दिली नाही तर उत्पल पर्रीकर हे अपक्ष निव़डणूक लढणार असल्याची चर्चा आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. "मनोहर पर्रीकर हे गोव्याचे प्रमुख नेते होते. गोव्याच्या विकासात त्यांचे नक्कीच योगदान होते. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाचा भारतीय जनता पक्षाने ज्याप्रकारे अपमान केला आहे, ते कुणाच्या मनाला पटलेलं नाही, परीकर यांच्या कुटुंबाविषयी तुम्ही अशा प्रकारे बोलताय तर तुमची लायकी काय?" या शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे. तसेच "उत्पल पर्रीकर जर अपक्ष लढणार असतील तर सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून उत्पल पर्रीकर यांच्या मागे ठामपणे उभे राहावे." असे आवाहन देखील संजय राऊत यांनी केले आहे.

Tags:    

Similar News