शिवसंग्रामचे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Update: 2021-09-02 11:42 GMT

अहमदनगर : मराठा समाजाचे आरक्षण 5 मे रोजी सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने संसदेच्या अधिवेशनात 102 व्या घटना दुरुस्ती करून 127 वी घटना दुरुस्ती केली. राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार दिला असताना राज्य सरकार कोणतेही पाऊल उचताना दिसत नाही, सरकारने तातडीने मराठा समाजाला मागास ठरवुन आरक्षण लागु करावे या मागणीसाठी शिव संग्रामच्यावतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

राज्य सरकार कुठलीही ठाम भूमिका घेत नसल्याने मराठा समाज्यात प्रचंड नाराजी असुन सरकारकडे विविध मागण्याचा ठराव करून आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे.

यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान मराठा समाजाच्या मुंबईत झालेल्या बैठकीदरम्यान 18 मागण्यांचा ठराव करण्यात आला. मात्र राज्य सरकार त्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने शिवसंग्रामने आक्रमक होत आंदोलन सुरू केलं आहे.येत्या काळात लवकरात लवकर मराठा समाज्याच्या सर्व मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Tags:    

Similar News