पाच राज्यांच्या निकालावर शरद पवार यांची प्रतिक्रीया

Update: 2022-03-10 11:21 GMT

देशात पाच राज्यातील निवडणूकांच्या रणधूमाळीने वातावरण चांगलेच तापले होते. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. तर सात टप्प्यात मतदान पार पडले. त्याचा आज निकाल लागला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली.

देशात पाच राज्यांच्या निवडणूकांमध्ये पंजाब वगळता चारही राज्यात जनतेने भाजपला कौल दिला आहे. त्यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली.

यावेळी शरद पवार म्हणाले की, शेतकरी आंदोलनाचा आम आदमी पक्षाला फायदा झाला. कारण दिल्लीत दिलेल्या सुविधांमुळेच पंजाबने आम आदमीला स्वीकारले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. लोकांनी दिलेल्या कौलाचा आदर केला पाहिजे. त्याबरोबरच सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणून भाजपला पर्याय देण्याबाबत चर्चा करू, असे शरद पवार यंनी सांगितले.

पुढे शरद पवार म्हणाले, पाच राज्यांच्या निवडणूकीत चार राज्यांमध्ये सत्तेला पाठींबा देण्याचा निर्णय नागरीकांनी घेतला आहे. त्यामुळे पंजाब वगळता इतर राज्यांमध्ये भाजपची सत्ता कायम राहणार आहे. मात्र उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची काही चूक नाही. त्यामुळे अखिलेश यादव यांनी लोकशाहीवर विश्वास ठेऊन कॉमन मिनिमम प्रोग्रामप्रमाणे कामे करावीत, असा सल्ला शरद पवार यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना दिला.


Full View

Tags:    

Similar News