शरद पवार राष्ट्रपती होणार? शरद पवार म्हणाले...

Update: 2021-07-14 13:38 GMT

निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यासह राहुल गांधी (Rahul Gandhi) प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार हे विरोधी पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असल्याची चर्चा रंगली आहे.

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मंगळवारी भेट घेतली होती. या भेटीनंतर ही भेट शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार ठरवण्यासाठी करण्यात आल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं यावर शरद पवार यांनी आज पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

NEWS 18 ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. या वृत्तात न्यूज 18 शी बोलताना शरद पवार यांनी हे सर्व वृत्त फेटाळले आहेत. शरद पवार यांनी प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांची भेट राष्ट्रपती निवडणूकीसाठी नसल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

प्रशांत किशोर यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मोदीविरोधी राष्ट्रीय आघाडीसाठी जुळवाजुळव सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांची भेट महत्त्वाची मानली जाते आहे. पण ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी झाली याची माहिती मिळू शकलेली नाही.

काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीला प्रियंका गांधी, के.सी. वेणू गोपाल आणि पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत उपस्थित होते.

Tags:    

Similar News