लाकुड तुम्ही देत आहात पण हातोडा आम्हीच मारला, संजय राऊत यांचे सरकारवर टीकास्र

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारत नपुंसक आणि शक्तीहीन असल्याचे म्हटले. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली.

Update: 2023-03-30 07:42 GMT

महाराष्ट्र सरकार नपुसंक आणि शक्तीहीन असल्याचे वक्तव्य केले. त्यावर बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकावर टीका केली.

यावेळी संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) अस्तित्वातच नाही, हे आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून सांगत आहोत. आम्ही या सरकारला सरकार मानतच नाहीत. एवढंच नाही तर गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील जनता या सरकारला नपुंसक म्हणत आहे. तर आता सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) या सरकारला नपुंसक आणि शक्तीहीन असल्याचे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे कान टोचले त्याबद्दल आम्ही न्यायालयाचे आभार मानतो. कारण राज्यात अस्थिरता निर्माण व्हावी, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप करतानाच देवेंद्र फडणवीस हे निराशाग्रस्त आणि वैफल्यग्रस्त असल्याचे संजय राऊत म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारबाबत जे शब्द वापरले तशा प्रकारचे शब्द इतर कुठल्याही राज्याबाबत वापरले नाहीत, असं संजय राऊत म्हणाले. तसेच मुख्यमंत्री स्वतःला गुलाम असल्याची जाणीव करून देत आहेत. बसू का? खाऊ का? ऊठू का? असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला.

लाकूड महाराष्ट्रातून नेत आहात ते भाजपच्या मालकीचे नाही. महाराष्ट्राचे योगदान लढ्यात कायम आहे. महाराष्ट्राचे योगदान म्हणजे शिवसेना (Shiv Sena) पक्ष प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी दिलेला लढा, लाकूड तुम्ही देत आहात पण हातोडा आम्हीच मारला, असं संजय राऊत म्हणाले.

Full View

Tags:    

Similar News