बेळगावातील कानडी दादागिरीवर राज्य सरकार गप्प का? संजय राऊत यांचा घरचा आहेर

Update: 2021-10-03 06:18 GMT

सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारची विविध मुद्द्यांवरुन भक्कमपणे बाजू मांडण्याचे काम करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. बेळगावात मराठी भाषिकांची गळचेपी सुरू असताना महाराष्ट्र सरकार गप्प का, असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.

"कर्नाटकमधे मराठी भाषिकांची गळचेपी होत आहे. कर्नाटकमध्ये 15 टक्के मराठी भाषिक असून ते अल्पसंख्याक आहेत, असं कर्नाटक सरकार म्हणत आहे. सीमा भागात 60 तर 65 टक्के मराठी बांधव आहेत. सीमाभागाचे कानडीकरण केले गेले. मराठी टक्का राजकीय स्वार्थासाठी कमी करण्याचे काम आणि कर्नाटक सरकारचा डाव आहे. राज्य सरकार याबाबत का गप्प आहे, हे कळत नाही. राज्य सरकारने एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ हे दोन मंत्री यासाठी नियुक्त केले आहेत. ते समनव्यक आहेत, या दोन्ही मंत्र्यांनी तिथे जाऊन यासंदर्भात चर्चा करायला पाहिजे. महाराष्ट्र सरकार यावर का गप्प आहे हे कळत नाही, यावर मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन" असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.


Full View

Tags:    

Similar News