केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक, मुख्यमंत्र्यांवरील टीका भोवली

Update: 2021-08-24 10:25 GMT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका करणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. संगमेश्वरमधून नारायण राणे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर राणे यांच्याच गाडीतून पोलीस त्यांना घेऊन गेले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी या कार्यकर्त्यांना बाजूला केले आणि राणेंना घेऊन पोलीस पुढे गेले. राणे यांच्याविरोधात महाड, नाशिक आणि पुण्यात FIR दाखल करण्यात आले आहेत. यानंतर राणे यांनी रत्नागिरीच्या कोर्टात धाव घेतली होती, पण कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला. त्यानंतर नारायण राणे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. तसेच तिन्ही FIR रद्द करण्याची मागणी केली होती. पण हायकोर्टाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्याने राणेंना धक्का बसला.

दरम्यान पोलीस नारायण राणे यांना अटक करण्यासाठी संगमेश्वरमध्ये नारायण राणे थांबलेल्या कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांच्यासोबत प्रसाद लाड, निलेश राणे, उपस्थित होते. पण अखेर पोलिसांनी राणे यांना अटक केली. पोलिसांकडे अटक वॉरंट नव्हते असा आरोप भाजप नेते प्रमोद जठार यांनी केला आहे,

दरम्यान नारायण राणे यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ७ वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांमध्ये थेट अटक करता येत नाही, त्याबाबत पोलिसांना नोटीस द्यावी लागते. पण असेही काहीही कऱण्यात आले नसल्याची माहिती राणे यांचे वकील एड. अनिकेत निकम यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News