पेट्रोल डिझेलच्या करातून मोदी सरकारने किती पैसे कमावले?

पेट्रोल डिझेलच्या करातून मोदी सरकारने किती पैसे कमावले? parliament monsoon session Narendra Modi government earns big on fuels tells parliament excise duty petrol diesel natural gas

Update: 2021-07-20 12:50 GMT

पेट्रोल डिझेलचे दर आभाळाला भिडलेले असताना मोदी सरकार हे दर कमी करायचं नाव घेत नाही. त्यामुळं लोक संताप व्यक्त करत आहेत. वाढत्या महागाई वरुन संसदेच्या दिल्ली येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी गदारोळ पाहायला मिळाला.

लोकसभेत आणि राज्यसभेत विरोधकांनी पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाल्याचं सांगत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत झालेली आहेत, ज्यामुळे लोक अस्वस्थ आहेत. पेट्रोलच्या किंमतींनी शतकांचा आकडा ओलांडला आहे, तर डिझेलच्या किंमतीही सतत वाढत आहेत. आणि या दरवाढीचा फटका सामान्य जनतेला पडत असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या महागाईवर विरोधी पक्ष केंद्र सरकारला सतत घेराव घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.

या दरम्यान सरकारने पेट्रोल डिझेल च्या करातून किती पैसे कमवले? याबाबत माहिती दिली आहे.



पेट्रोल - डिझेल आणि नैसर्गिक गॅस उत्पादन शुल्कातून सरकारला २०१३ – १४ ला ५३ हजार ०९० कोटी रुपये मिळाले होते.

तर एप्रिल २०२० - २१ मध्ये ती वाढून २ लाख ९५ हजार २०१ कोटी इतकी झाली आहे. तसेच २०१३ - १४ चा एकूण महसूल १२,३५,८७० कोटींचा होता. तो आता वाढून २४,२३,०२० कोटी झाला आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर १०१.८४ रुपये आहे, तर मुंबईत पेट्रोलची किंमत १०७.८३ रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल प्रतिलिटर १०१.४९ रुपये आहे तर बंगळुरूमध्ये पेट्रोलची किंमत ११०.२० आहे. या वाढत्या किंमतींमुळे लोक हैराण झाले आहेत.

Tags:    

Similar News