'पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज'- देवेंद्र फडणवीस

Update: 2021-09-30 02:46 GMT

मुंबई : मागील दोन दिवसांपासून राज्यात काही भागात पावसानं चांगलाच जोर धरला आहे. गुलाब चक्रीवादळामुळे हवामानात बदल होऊन त्याचा फटका महाराष्ट्रातील काही भागांना बसला आहे. मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. तर सरकारी माहितीनुसार यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत तब्बल ४३६ जणांचा मृत्यू झाला आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे", असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत राज्यात पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि राज्य सरकारची भूमिका यावर भाष्य केलं आहे. "राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही", असं फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Tags:    

Similar News