गोपिचंद पडळकर यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा म्हणाले...

Update: 2021-09-04 09:16 GMT

सध्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तापलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात नुकतीच सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढ ढकलण्याची एक मुखी मागणी सर्व पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. मात्र, ओबीसी आरक्षण उपसमितीच्या कामकाजावरून आमदार गोपिचंद पडळकर यांनी थेट सरकारवर निशाणा साधला आहे.

ओबीसी आरक्षणा संबंधी, शासकीय लाभ व सवलती संदर्भात आणि ओबीसी संघटनांच्या विविध मागण्यांचा समग्र अभ्यास करून मंत्रीमंडळाला शिफारस करण्यासाठी १४ ऑक्टोबर २०२० ला मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली. या उपसमितीला आता वर्ष होत आलं आहे. मात्र, या समितीची एकही बैठक झालेली नाही. यावरून गोपिचंद पडळकर यांनी सरकारवर निशाणा साधताना OBC नेत्यांची उपसमिती शोधण्यासाठी 'टास्क फोर्स'ची स्थापना करा अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीमधील मंत्री

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, माजी वनमंत्री संजय राठोड, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील. अशा दिग्गज नेत्यांचा या समितीत समावेश आहे.

Full View
Tags:    

Similar News