नितीश पास... उध्दव फेल... राजकारणाचा खेळ

Update: 2022-08-09 05:45 GMT

भारतीय जनता पक्ष आपला पक्ष फोडणार आहे याची कुणकुण लागताच बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी आपल्या आमदार खासदारांना ताब्यात घेतलं. पक्षाची पकड मजबूत केली. आणि आपलं मुख्यमंत्रीपद वाचवलं. सरकारचा राजीनामा देत तात्काळ राष्ट्रीय जनता दलासोबत घरोबा केला. (( रिवाइन्ड इफेक्ट ) आता थोडं मागे जाऊया.. असंच काहीतरी महाराष्ट्रात होत होतं. भाजप शिवसेनेला संपवतोय अशी कुणकुण लागताच शिवसेनेने ही भाजप पासून उचित दूरी ठेवण्याचा फैसला घेतला.

तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या सभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येण्यामागेही कुठल्याही पद्धतीत भाजपशी पुन्हा घरोबा करायचा नाही या संकल्पाचं कारण होतं. उध्दव ठाकरेंनी निवडणूकपूर्व युती तोडून नवीन घरोबा केला आणि राज्यात भाजपा सत्तेबाहेर राहिली. त्यानंतर केंद्रीय एजन्सींचा वापर करून भाजपने शिवसेनाच फोडली आणि महाराष्ट्रात पुन्हा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार बनवलं.

बिहार मध्ये ही जास्त जागा येऊनही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवलं होतं, महाराष्ट्रात आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं आहे. नितीश कुमारांनी राजकीय चाणाक्षपणा दाखवत आपला पक्ष आणि सरकार दोन्ही वाचवलं मात्र उध्दव ठाकरे यांना पक्ष आणि सरकार दोन्ही वाचवता आलं नाही. धोक्याची घंटा वाजल्यानंतर केवळ सतर्क होऊन उपयोग नसतो तर त्यावर तात्काळ कारवाई ही करावी लागते. उध्दव ठाकरे याबाबत खूपच सरळ निघाले. सध्यातरी राजकारणाच्या या खेळात नितीश पास तर उध्दव फेल ठरलेयत.


Full View

Tags:    

Similar News