“महाराष्ट्रात काहीही झालं की एका व्यक्तीचं नाव येतं…” पहाटेच्या शपथविधीवर पवाराचं मिश्कील भाषेत विधान

Update: 2023-02-22 11:22 GMT

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपुर्वी पहाटेच्या शपथविधी बाबत केलेल्या गौप्यस्पोटाबद्दल मागच्या काही दिवसांपासुन अनेक राजकिय नेत्यांनी या विषयावर त्यांच्या प्रतिक्रीया दिल्या, यावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी मिश्कील भाषेत टिप्पनी केली आहे.

पहाटेच्या शपथविधीबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र (Devendra Fadanvis) फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मोठा गौप्यस्फोट केला होता. या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टिकाही झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (NCP Chief Sharad Pawar )पवार यांच्याशी चर्चा करूनच आपण अजित पवार(Ajit Pawar) यांच्याबरोबर शपथ घेतली, असं विधान फडणविसांनी केलं होत. यावर अजित पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

पहाटेच्या शपथविधीमुळे एकच चांगली गोष्ट घडली ती म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली, असंही शरद पवार यावेळी म्हणाले. शरद पवार यांनी पहिल्यांदाच हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून २३ नोव्हेंबर २०१९ ला झालेला पहाटेचा शपथविधी चांगलाच चर्चेत आहे. या सगळ्याची शरद पवार यांना कल्पना होती, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. मात्र ते असत्य असल्याचं शरद पवार म्हणाले होते. आता आज त्यांचं नवं वक्तव्य समोर आलं आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष स्वत: शरद पवार यांनी मिश्कील भषेत टिका केली आहे.पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांशी चर्चा केली होती, या देवेंद्र फडणवीसांच्या विधानाबद्दल विचारलं असता “महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य आहे. इथं काहीही झालं की एका व्यक्तीचं नाव पुढं येतं, मग लातूरमध्ये एखादा भूकंप झाला तर तिथेही याच व्यक्तीचं नाव येतं…” अस पवार स्वतःला उद्देशुन म्हणाले. पवारांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमधे हास्याच वातावरण निर्माण झाल होत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचार सभेत पिंपरीचिंचवड (PimpariChincwad) इथे पवार बोलत होते. 

Tags:    

Similar News