अनिल बोंडेंनी अमरावतीत दंगलीचा कट रचला; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

Update: 2021-11-15 12:56 GMT

त्रिपुरामध्ये मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात राज्यातील मुस्मीम बांधवांनी शुक्रवारी 12 नोव्हेंबरला बंदचं आवाहन केलं होतं. या बंद दरम्यान राज्यातील मालेगाव, अमरावती, नांदेड या शहरांमध्ये हिंसक वळण लागलं होतं. या तीन ही शहरांमध्ये हिंसाचार झाल्याची घटना समोर आल्या आहेत.

या हिंसाचाराची पोलिस चौकशी करत असताना अमरावतीमध्ये झालेली दंगल हा सुनियोजित कट होता आणि भाजपचे नेते, माजी मंत्री अनिल बोंडे हा कट रचला असल्याचा गंभीर आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला. अमरावती येथे नियोजन पद्धतीने शहरात दंगल भडकवली गेली. याची चौकशी पोलिस करत आहेत. मुंबईतून पैसे पाठविण्यात आले असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.

जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा भाजप दंगलीचे अस्त्र बाहेर काढते. मात्र, राज्यातील जनतेला दंगलीचे राजकारण कधीही आवडत नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यात येऊन सांगतात की, महाराष्ट्राच्या सरकारला उखडून टाकू. मात्र, सरकारे अशी उखडली किंवा बसवली जात नाहीत.

केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून धमकावले जाते. बंगालमध्ये हे दिसले. नेत्यांना घाबरवून भाजपमध्ये घेतले गेले. मात्र जेव्हा तृणमूलचे सरकार आले तेव्हा त्याच नेत्यांनी पुन्हा आपल्या पक्षात प्रवेश केला. भाजपला हे समजायला हवे की, तुम्ही पैसे आणि केंद्रीय यंत्रणाच्या माध्यमातून सरकारे उखडू शकत नाही असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे वाद निर्माण झाला होता. यामुळे काही ठिकाणी बंद पुकारला गेला. ज्याला हिंसक वळण लागले. काही ठिकाणी दगडफेकही झाली. अशा सर्व लोकांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

मालेगावमध्ये निघालेल्या मोर्चामध्ये देखील अशीच अप्रिय घटना घडली. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक करण्यात आल्याची चर्चा झाली. मात्र, त्यात तथ्य नाही. मुफ्ती ईस्माईल यांनी काही वर्षांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली तिथे काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर नगरसेवक निवडून आले होते. मात्र, त्यानंतर मुफ्ती ईस्माईल यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत निवडून आलेले सर्व नगरसेवक देखील गेले होते. त्यामुळे नगरसेवक हे कागदोपत्री राष्ट्रवादीचे असले तरी ते एमआयएममध्ये गेलेले आहेत. असं स्पष्टीकरण नवाब मलिक यांनी दिलं आहे.



Full View

Tags:    

Similar News