NagarPanchayatElection राणेंना जोरदार धक्का : कुडाळ, देवगड गमावले

Update: 2022-01-19 07:51 GMT

 सिंधुदुर्गातील चार पैकी दोन नगरपंचायती भाजपनं गमावल्या आहे. देवगड आणि कुडाळमधे शिवसेना, कॉंग्रेसनं नारायण राणेंच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे.सिंधुदुर्गातील देवगड मतदारसंघ नेहमीच भाजपाचा बालेकिल्ला राहीलेला आहे. अनेक वर्ष भाजपच्या ताब्यात असलेली देवगड नगरपंचायतीला शिवसेनेने सुरुंग लावला आहे. हा नितेश राणेंना मोठा धक्का आहे. देवगडमधे शिवसेनेनं आठ तर राष्ट्रवादीनं एक जागा जिंकली. भाजपला आठ जागांवर समाधान मानावं लागलं.



 




कुडाळच्या मतदारांनी नारायण राणेंना व त्यांच्या मुलांना या निवडणुकीतून जागा दाखवली आणि भाजपला सत्ते पासून दुर ठेवलं आहे. कॉंग्रेस जरी स्वतंत्र निवडणूक लढली असली तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांशी चर्चा करून कुडाळ नगरपंचायतीत महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष बसवणार असे आ. वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

कुडाळमधे मागील निवडणुकीत भाजपला ९ जागा मिळाल्या होत्या. १७ जागांच्या या नगरपालिकेत भाजपला यंदा ८ जागा जिंकत आल्या आहेत. शिवसेनेवा ७ आणि कॉंग्रेसला दोन जागा मिळाल्यानं कॉंग्रेस आता किंगमेकरच्या भुमिकेत आहे.

सिंदुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी आणि कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक ही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची केली आहे. वैभववाडी नगरपंचायतीवर नारायण राणेंच्या गटाने वर्चस्व राखले आहे. वैभववाडी नगरपंचायतीत 17 जागांपैकी भाजपला 10 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला 5 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्षांच्या वाट्याला दोन जागा मिळाल्या आहेत.


Full View

Tags:    

Similar News