नारायण राणे अटक: काय आहे वृत्तपत्राच्या हेडलाईन

Update: 2021-08-25 06:00 GMT

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात नव्याने मंत्री झालेले मंत्री देशभरात जनआशीर्वाद यात्रा काढत आहेत. मात्र या सर्वांमध्ये नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची मोठी चर्चा सुरू आहे. कारण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देश स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव की अमृत महोत्सव यात गोंधळ उडाला होता. यावर नारायणे राणे यांनी प्रतिक्रिया देत "बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असतं" असं वादग्रस्त विधान केलं. या विधानानंतर संपूर्ण राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र दिसलं. मुख्यप्रवाहातील माध्यमांच्या स्क्रिनवर, डिजिटल माध्यमांच्या वेबसाईट, फेसबुक, युट्युबवर एकचं चर्चा होती ती म्हणजे नारायण राणे यांना अटक होणार का? दुपारी 2 नंतर राणेंना अटकही झाली. रात्री उशीरा जामीनही मंजूर झाला. या दिवसभरातील अटक नाटकात रंगलेलं राजकारण आणि माध्यमांच कव्हरेज नेमकं कसं होतं? आजच्या महत्त्वाच्या वृत्तपत्रातल्या हेडलाईन काय म्हणतायेत आणि विशेष म्हणजे सामना आणि प्रहार वृत्तपत्राने नेमकं काय म्हटलंय… पाहुयात

सामना वृत्तपत्राची हेडलाईन... निकल गयी सब हेकडी इनकी, महाड कोर्टात रात्री उशिरा जामीन (नारायण राणेंना अटक)

मी नॉर्मल माणूस आहे काय, कॅबिनेट मंत्री आहे. पोलीस मला अटक करू शकत नाही. अशी गुर्मीची भाषा करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची हेकडी रत्नागिरी पोलिसांनी आज उतरवली, मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांना पोलिसांनी दुपारी उचलले आणि अटक करून थेट संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेले. अटकपूर्व जामिनासाठी राणे यांच्या वकिलांनी रत्नागिरीपासून मुंबईपर्यंत धावाधाव केली, पण रत्नागिरी आणि उच्च न्यायालय या दोन्ही ठिकाणी त्यांची याचिका फेटाळण्यात आली. महाड पोलिसांत राणेविरोधात गुन्हा दाखल असल्यानं रत्नागिरी पोलिसांनी त्यांना महाड पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान रात्री राणेंना महाड कोर्टात हजर केले असता पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली. मात्र कोर्टाने राणे यांची जामिनावर मुक्तता केली.तसेच दिवसभर घडलेल्या घडामोजींचा आढावा सामनाने दिला आहे.

http://epaper.saamana.com/EditionPage/EPpage.php?edn=Mumbai&isid=SAMANA_MUM_20210825#Page/1

तर दुसरीकडे नारायण राणे यांचे वृत्तपत्र असलेल्या प्रहारने नारायण राणे जामीन मंजूर, ठाकरे सरकारची सूडबुद्धी अशी हेडलाईन दिली आहे.

माझ्यावर सरकारने चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले आहेत. मी केंद्रीय मंत्री आहे . माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून बेकायदेशीर पद्धतीने गुन्हे दाखल करणे हा राजद्रोह आहे. राज्य सरकारनं सुडाचे राजकारण करू नये. अशा मथळ्याखाली दिल्ली ते गल्ली भाजपच्या समर्थकांनी केलेल्या आंदोलनाची माहिती दिली आहे. 'हम आपके साथ है' अमित शाह पासून ते राज्यातल्या भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस, प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील, संबित पात्रा, आशिष शेलार इ. दिलेल्या प्रतिक्रिया प्रहारच्या पहिल्या पानावर पाहायला मिळतात.

https://epaper.prahaar.in/index.php?ed_date=25082021&ed_data-name=Mumbai&sub_ed_data-name=Main&page_no=1

लोकसत्ता वृत्तपत्राने राणेंना अटक व जामीन अशी फ्रंट हेडलाईन दिली आहे.

मुख्यमंत्र्यांबाबतच्या विधानाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले असून नारायण राणे यांना अटक आणि जामीन या नाट्यात राज्यातलं वातावरण तापलं. शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं पाहायला मिळाले. तसेच राणेंच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही. त्यांनी संयम दाखवायला हवा होता पण राज्य सरकारने केलेल्या बेकायदा कारवाईविरोधात भाजप राणेंच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. असं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

तर जनआशीवार्द यात्रेचे समन्वयक प्रमोद जठार यांनी माध्यमांशी बोलताना या परिसराच्या इतिहासाला उजाळा देत सरकारला लक्ष्य केले. छत्रपती संभाजी महाराजांना याच परिसरात फंदफितुरीने अटक करण्यात आली पण त्यांनंतरही औरंगजेबाला येथे यश आले नाही. उलट त्याचे थडगे बांधले गेले. त्याच प्रकारे या कारवाईमुळे राज्यातील महाआघाडी चे थडगे बांधले जाणार असं जठार यांनी म्हटलं.

 https://epaper.loksatta.com/3207063/loksatta-mumbai/25-08-2021#page/1/1

लोकमत या वृत्तपत्राने नारायण राणेंना अटक, सात तासांनंतर जामीन अशी हेडलाईन दिली आहे.

दिवसभर घडलेल्या घडामोडी आणि न्यायालयात नेमकं काय झालं या मथळ्याखाली लोकमतने बातमी दिली आहे. त्याचबरोबर जामीन देताना कोणत्या अटी दिलेल्या आहेत याची माहिती दिली आहे.

http://epaper.lokmat.com/main-editions/Mumbai Main /2021-08-25/1

Tags:    

Similar News