विधानसभाध्यक्ष निवडणूक पुढं ढकलली? कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी सोडला सुटकेचा निश्वास

Update: 2021-12-28 08:30 GMT

आज राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारने ठरवला आहे. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकीच्या नियमांना मंजूरी दिलेली नाही. भगतसिंह कोश्यारी यांनी नवीन नियमांबाबत आक्षेप घेतल्यानं आता ही निवडणूक पुढं ढकलंली असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.

मात्र, ही निवडणूक पुढं ढकलल्यानं कॉंग्रेसच्या मंत्र्यांसह राष्ट्रवादीसाठी आनंदाची बातमी समजली जात आहे. कारण राष्ट्रवादीकडे सध्या विधानसभेचं उपाध्यक्ष पद असून सध्या अध्यक्ष नसल्यानं उपाध्यक्ष यांच्याकडे विधानसभेच्या अध्यक्षतेखालीच कामकाज सुरु आहे. त्यामुळं राष्ट्रवादीसाठी ही बाब चांगलीच मानली जात आहे. तर कॉंग्रेसमधील मंत्र्यांना कॉंग्रेस हायकमांड राजीनामा देऊन विधानसभाध्यक्ष पद स्विकारायला लावतील अशी भीती होती. त्यातच ही निवडणूक पुढं ढकलली तर या मंत्र्यांसाठी ही आनंदाची बातमी मानली जात आहे.

सरकारने विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकीसाठी आवाजी मतदानाद्वारे निवडणूक घेण्याचा कायदा केला होता. मात्र, याला राज्यपालांनी मंजूरी दिलेली नाही. दरम्यान राज्यपालांच्या परवानगीविना विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक घेतल्यास घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळं महाविकासघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना डावलून विधानसभाध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.


Full View

Tags:    

Similar News