अटींचं उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने राणा दाम्पत्यास बजावली नोटीस

Update: 2022-05-09 09:43 GMT

खासदार नवनीत राणा(Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana)यांना काही दिवसांपूर्वीच जामीन मंजूर झाला होता.त्यांची तुरुंगातून सुटका झाली होती.आता मुंबई सत्र न्यायालयाने(Mumbai high court) आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना नोटीस बजावली असून त्यांनी जामीनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट का जारी करु नये, याविषयी त्यांचे म्हणणे मागितले आहे.

सरकारी वकिलांच्या अर्जाची सत्र न्यायालयाकडून दखल घेण्यात आली असून, तुमचा जामीन का रद्द करू नये ? अशी विचारणा करून न्यायालयाने राणा दाम्पत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्यास जामीन देताना काही अटी देखील घातल्या होत्या, मात्र जामिनानंतर राणा दाम्पत्यांकडून माध्यमांसमोर विविध विधानं केली गेली. त्यामुळे या अटींचं उल्लंघन झालं असल्याचं सरकारी पक्षाचं म्हणणं आहे. त्यामुळे आता न्यायालयाने राणा दाम्पत्यास नोटीस बजावली आहे.

मुंबई पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे की, रवी आणि नवनीत राणा यांनी त्यांच्या वक्तव्याने जामीन अटीचे उल्लंघन केले असून, जामीन आदेशानुसार त्यांचा जामीन रद्द व्हावा आणि या जोडप्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे.न्यायालयाने राणा दाम्पत्यास त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी नोटीस बजावली आहे. आता यावर सुनावणी कधी होईल याबाबत न्यायालयाने माहिती दिलेली नाही.

Tags:    

Similar News