SRA scam : मनसे -भाजपकडून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची कोंडी

मुंबई महापालिका निवडणूकीपुर्वी भाजप आणि मनसेने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कोंडी केली आहे. यामध्ये किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर पेडणेकर यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. याचा आढावा घेणारा मॅक्स महाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट

Update: 2022-11-01 13:58 GMT

किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांनी किशोरी पेडणेकर (Kishori pednekar)यांच्यावर SRA घोटाळ्याचे आरोप केले होते. याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यावर दादर पोलिस ठाण्यात (dadar police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच किशोरी पेडणेकर मंगळवारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे (sandip deshpande) यांनीही किशोरी पेडणेकर यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत.

किरीट सोमय्या यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरए प्रकल्पाला (Gomata janata SRA) भेट दिली. यानंतर किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर यांचे निकटवर्तीय असलेले चंद्रकांत चव्हाण (chandrakant chavan) यांनी सदनिका लाटल्याचा आरोप केला आहे. चंद्रकांत चव्हाण हे दादर पोलिसांच्या अटकेत आहेत. त्यांचे कुटूंब अजूनही गोमाता येथील सदनिकेत राहत असल्याचेही सोमय्या म्हणाले. याबरोबरच चंद्रकांत चव्हाण आणि किशोरी पेडणेकर यांनी मिळून घोटाळे केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला. तसेच आणखी दोन घोटाळ्यांची कागदपत्रं माझ्याकडे असून त्यामध्येही किशोरी पेडणेकर आणि चंद्रकांत चव्हाण यांचाच हात असल्याचे मत सोमय्या यांनी व्यक्त केले.

यानंतर संदीप देशपांडे यांनीही एसआरए घोटाळ्यातील चंद्रकांत चव्हाण हे ज्या परिसरात वॉर्ड ऑफिसर होते. तेथे किशोरी पेडणेकर नगरसेविका होत्या. तसेच किशोरी पेडणेकर नव्या ठिकाणी नगरसेविका झाल्याने त्या परिसरातही एसआरए घोटाळा झाल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. मात्र पोलिस चौकशीनंतर बोलताना किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली असताना मनसे (MNS) आणि भाजपने (BJP) किशोरी पेडणेकर यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे याचा फटका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (shivsena Uddhav balasaheb Thackeray) पक्षाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags:    

Similar News