उपराष्ट्रपती पदासाठी पाठिंबा कुणाला, शिवसेनेचे ठरले !

Update: 2022-07-19 08:37 GMT

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी विरोधकांतर्फे मार्गारेट अल्वा यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू य़ांच्याविरोधात विरोधकांच्या आघाडीतर्फे यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांतर्फे मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.




 


या निवडणुकीत खासदारांच्या दबावामुळे उद्धव ठाकरे यांना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा लागला. पण उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मात्र शिवसेनेने विरोधकांच्या आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. मार्गारेट अल्वा यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि अधीर रंजन चौधरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि इतर विरोधी पक्षांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.





 


संजय राऊत हे अल्वा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना पुढच्या रांगेत बसलेले दिसत आहेत. तसेच याआधी शरद पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीतही संजय राऊत उपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेने भाजपऐवजी विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते आहे.

Tags:    

Similar News