महादेव जानकर यांची सावध भूमिका घेत भाजपवर टिका...

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला. यावर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सावध भूमिका घेत, भाजपवर टिका केली आहे.

Update: 2023-02-21 16:32 GMT

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला बहाल केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यावर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपल्या विविध प्रतिक्रिया नोंदवल्या. मात्र राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी सावध भूमिका घेत भाजपवर बोचरी टिका केली आहे. काँग्रेस (Congres) आणि भाजपा (Bjp) हे दोन्ही फसवे पक्ष असल्याचे मी मंत्री असताना सांगितल्याचे महादेव जानकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

आम्ही एका पक्षाचे मालक आहोत, कुणाच्या हातचे बाहुले नाहीत. हे पक्ष जसा मोठा मासा छोट्या माशाला खातो तसं आम्हाला खात आहेत, असं वक्तव्य जानकर यांनी यावेळी केले. त्यामुळे आता आम्हाला सावध राहावे लागणार असल्याचे जानकर यांनी सांगितले. आता काँग्रेसचीच भाजप झाली आहे. असा हल्लाबोल जानकर यांनी केला आहे. 

Tags:    

Similar News