महाविकास आघाडी फुटणार, अजित पवार यांचे स्पष्ट संकेत

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता महाविकास आघाडीही फुटणार अशी चर्चा रंगली आहे.

Update: 2022-11-05 02:30 GMT

Ajit Pawar 

महाविकास आघाडीतील नेत्यांमधील धुसफुस वारंवार समोर येत असल्याने महाविकास आघाडीत अलबेल नसल्याची चर्चा होती. त्यापार्श्वभुमीवर अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas aghadi) स्थापन सत्ता स्थापन केल्यापासून अंतर्गत कलह असल्याची चर्चा होती. त्यातच एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील (shivsena) 40 आमदारांचा गट भाजपसोबत (BJP) गेल्याने सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र राज्यात झालेल्या सत्तांतरानंतरही महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये धुसफुस असल्याची चर्चा होती. ही चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेकदा नाकारली. परंतू अजित पवार (Ajit pawar) यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेस मंथन वेध भविष्याचा (NCP manthan vedh bhavishacha) या शिबीरात मोठं वक्तव्य केलं आहे.

अजित पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body election) निवडणूकांना दिलेली स्थगिती न्यायालय कधीही उठवू शकते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढवण्याची तयारी करा, असं आवाहन केले. तसेच अजित पवार यांनी राज्य सरकारवरही टीकास्र सोडले.

अजित पवार राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेच्या सांगता सभेत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना निवडणूका स्वबळावर लढवण्याची तयारी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शिर्डी येथील शिबीरातूनही अजित पवार यांनी आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

Tags:    

Similar News