भाजपसोबत जाणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घणाघात

Update: 2022-06-24 10:13 GMT

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यापार्श्वभुमीवर शिवसेना भाजप सोबत जाणार का? अशी चर्चा रंगली होती. त्या चर्चेला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुर्णविराम दिला आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात बंड केले. तसेच आपल्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावा शिंदे गटाने केला. त्यापार्श्वभुमीवर शिवसेना भाजप सोबत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या चर्चेला पुर्णविराम दिला आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी जे बंड केले आहे. या बंडामागे भाजपचा हात आहे. तर अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उध्दव ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाजपवर उघडपणे टीका केली आहे. उध्दव ठाकरे हे शिवसेना पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन संवाद साधत होते.

तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र मी कदापिही भाजपसोबत जाणार नाही, असं वक्तव्य उध्दव ठाकरे यांनी केलं.

उध्दव ठाकरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्ला केला. यामध्ये ठाकरे म्हणाले की, स्वतःचा मुलगा खासदार झालेला चालतो आणि आदित्यला कोणी बडवा म्हणत असेल तर ते कदापिही सहन केलं जाणार नाही. बाळासाहेब ठाकरे असताना मला बडवा म्हटले जात होते. त्यानंतर आता मी मुख्यमंत्री असताना आदित्यला बडवा म्हटलं जात असल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले.

Tags:    

Similar News