बंडखोर आमदार दलित आणि वंचित विरोधी असल्याचा आरोप

Update: 2022-06-28 07:20 GMT

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केल्यानंतर हे बंडखोर आमदार दलित आणि वंचित विरोधी असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी (खरात गट) चे नेते सचिन खरात यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केल्याने शिवसेनेत उभी फुट पडली. तर या बंडामुळे सरकार अस्थिर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर रिपब्लिकन पक्ष (खरात गट) चे नेते सचिन खरात यांनी बंडखोर आमदारांना दलित आणि वंचित विरोधी असल्याचे म्हटले आहे.

सचिन खरात म्हणाले की, ज्या वेळेस राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. त्यावेळी राज्यावर कोरोनाचे संकट आले. तर या संकटात सरकारने वंचित-शोषित समाजाला आर्थिक मदत दिली. तसेच हे सरकार शाहु, फुले, आंबेडकर, रयतेचे राजे शिवाजी महाराज,संभाजी राजे, अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराने का चालत आहे मात्र हेगडेवार यांच्या विचाराने का चालत नाही म्हणुन या बंडखोर आमदारांच्या पोटात दुखलं असल्याचे सचिन खरात यांनी म्हटले आहे.

हे बंडखोर आमदार हे हिंदूत्व सुध्दा मानत नाहीत. त्याबरोबरच त्यांचे वर्तन हे दलित विरोधी आणि वंचित विरोधी असल्याचे म्हटले आहे.

Full View

Tags:    

Similar News