"फडणवीस यांना उद्धव ठाकरेंनी फोन केल्याच्या बातम्या केवळ थापा"

Update: 2022-06-28 07:32 GMT

राज्यातील सत्तानाट्यामध्ये सध्या विविध माध्यमांमधून विविध बातम्या दिल्या जात आहेत. याच गदारोळात सोमवारी काही माध्यमांनी २१ जून रोजी एकनाथ शिंदे नॉटरिचेबल होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातर्फे देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे वृत्तही काही माध्यमांनी दिले होते. त्यानंतर खळबळ उडाली. पण आता या वृत्तावर शिवसेनेतर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

२१ जून रोजी एकनाथ शिंदे आणि इतर काही आमदार सुरतमध्ये दाखल झाल्याच्या वृत्ताने राज्यात खळबळ उडाली होती. शिवसेनेसाठी हा धक्का होता. महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेने बाहेर पडावे अशी मागणी या आमदारांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या सहकाऱ्याने देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. पण यावर आता शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

"सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता, सूत्रांच्या हवाल्याने अशा बातम्या प्रकाशित होत आहेत, ह्या निव्वळ भूलथापा आहेत, उद्धव साहेब ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये." असे त्यांनी स्पष्ट केले आहे."फडणवीस यांना उद्धव ठाकरेंनी फोन केल्याच्या बातम्या केवळ थापा"

Tags:    

Similar News