Political Crisis : 16 की 39 कोणता आकडा लागणार?

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर नेमका कोणता आकडा लागणार? याचीच जोरदार चर्चा रंगली आहे.

Update: 2023-05-10 17:42 GMT

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात (supreme Court) गेला. त्याचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. त्यात 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय येणार आहे. मात्र 16 आमदार अपात्र होणार की 39 याविषयी चर्चा रंगली आहे. त्यामुळे उद्या 16 की 39 कोणता आकडा लागणार? अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासह 16 आमदार सुरतमार्गे (Surat to guwahati) गुवाहाटीला गेले होते. त्यामुळे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirval) यांनी 16 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची नोटीस काढली होती. मात्र उरलेल्या आमदारांच्या विरोधात अपात्रतेची नोटीस काढण्यात आली नव्हती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 16 आमदारांचे भविष्य ठरणार आहे.

16 आमदार अपात्र झाले तर उर्वरित 24 जणांचं काय? (16 MLA Disqualify decision)

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर 16 बंडखोर आमदारांनाच नोटीस देण्यात आली होती. त्यामुळे या 16 आमदारांच्याबाबतीतच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र यामध्ये 16 आमदार अपात्र झाले तर तोच न्याय उर्वरित 24 आमदारांना लागू होऊ शकतो. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा द्यावा लागू शकतो, असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

कोण आहेत 16 आमदार? (Who is 16 MLA)

  • एकनाथ शिंदे- ठाणे
  • तानाजी सावंत- भूम परंडा
  • प्रकाश सुर्वे- मागाठाणे, मुंबई
  • बालाजी किणीकर- अंबरनाथ, ठाणे
  • लता सोनावणे- चोपडा
  • अनिल बाबर- खानापूर
  • यामिनी जाधव- भायखळा, मुंबई
  • संजय शिरसाट- छत्रपती संभाजीनगर पश्चिम
  • भरत गोगावले- महाड, रायगड
  • संदीपान भुमरे- पैठण
  • अब्दुल सत्तार- सिल्लोड
  • महेश शिंदे- कोरेगाव
  • चिमणराव पाटील- एरंडोल
  • संजय रायमूलकर- मेहेकर
  • बालाजी कल्याणकर- नांदेड उत्तर
  • रमेश बोरणारे- वैजापूर
Tags:    

Similar News