लखीमपूर खेरी: महाराष्ट्र बंद अजय मिश्रांचा राजीनामा घ्या...

Update: 2021-10-10 08:22 GMT

3 ऑक्टोबर ला लखीमपूर-खेरी येथे झालेल्या हिंसाचारात 8 लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये 4 शेतकऱ्यांचा समावेश आहे. या संदर्भात देशभरात संतापाची लाट आहे. या हिंसाचारामागे केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा चा हात असल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदीची हाक दिली आहे. या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

काय म्हटलंय नवाब मलिक यांनी?

Full View

काय आहे प्रकरण?


रविवार, 3 ऑक्टोबर ला लखीमपूर-खेरी येथे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखीमपूर-खेरी येथील काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार होते. त्यानंतर त्यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे मूळ गाव बनबीरपूरला जायचे होते. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच शेतकरी नेते काळे झेंडे दाखवण्यासाठी अजयकुमार मिश्रा यांच्या गावात पोहोचले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांवर गाडी घातली. या अपघातात अनेक शेतकरी जखमी झाले. तर काहींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट आहे.

Tags:    

Similar News