हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून किशोरी पेडणेकर राज ठाकरेंवर भडकल्या

Update: 2022-05-08 05:20 GMT

राज ठाकरे यांनी भोंग्यांवरून घेतलेल्या भुमिकेमुळे शिवसेनेचं हिंदुत्व विरुध्द राज ठाकरे यांचं हिंदूत्व असा सामना रंगला आहे. त्यातच राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ ट्वीट करून शिवसेनेची हवा काढून घेतली. त्यातच राज ठाकरे यांच्या भुमिकेबाबत मॅक्स महाराष्ट्रच्या To The point कार्यक्रमात मुंबईच्या काळजीवाहू महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रश्न विचारला असता किशोरी पेडणेकर भडकल्या.

सध्या राज्याचे राजकारण हे भोंग्यांचा मुद्द्यावरून चांगलेच तापले आहे. राज ठाकरेंनी प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भुमिकेमुळे ते सध्या चर्चेत आहेत. त्यांनी भोंग्याचा मुद्द्यावरून थेट शिवसेनेला टार्गेट केले आहे. या सगळ्यामध्ये आगामी मुंबई महानगरपलीचेच्या निवडणूका डोळ्यासमोर आल्याने राज ठाकरे यांचा रोष हा शिवसेनेवर असल्याची चर्चा आहे.

राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदूत्व हायजॅक केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे राज ठाकरे विरुध्द उध्दव ठाकरे यांचं हिंदूत्व असा सामना रंगला आहे. मात्र राज ठाकरे यांचा शिवसेनेवर इतका राग का? असा प्रश्न मॅक्स महाराष्ट्रच्या कार्यक्रमात विचारला. त्यावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "त्यांना वाटत होतं की, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना चालणार नाही. पण शिवसेना नुसती चालली नाही तर ती हजार पावलांनी पुढे नेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबाबत टीका केली जाते. मात्र सर्वच वक्तृत्वातून होत नाही त्याच्यासाठी संयम आणि नित्यनेमाने काम करावे लागते असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

Full View

Tags:    

Similar News