सुनो देशवासियों, `दो` मुख्यमंत्री क्या बोल रहे हैं?

Update: 2022-02-08 06:24 GMT

 संसदेत मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील उत्तर देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात कॉंग्रेसवर टीका आणि अनेक आरोपही केले.देशात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र `कॉंग्रेस` आणि दिल्लीतील `आप` कारणीभूत आहेत.अशी टीका मोदींनी केली.त्यावरुनच सोमवारी रात्री उत्तरप्रदेशचे मुख्य़मंत्री योगी आदित्यनाथ यांनी एकापाठोपाठ ट्विट करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.बराचवेळ योगी आदित्यनाथ आणि केजरीवाल यांच्यामध्ये ट्विटरवॉर सुरु होते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरावरील केजरीवाल यांच्या वक्तव्याचा निषेध केला.योगी यांनी ट्विट करत पंतप्रधानबद्दल अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याचा निषेध केला.पंतप्रधानांबद्दल अरविंद केजरीवाल यांचे आजचे वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे. अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी" असे म्हटले आहे.

या ट्विटनंतर याोगींनी आणखी एक ट्विट केले. केजरीवाल हे खोटं बोलण्यात महारथी आहेत, जेव्हा संपुर्ण देश प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये कोरोनासारख्या जागतिक महामारीसोबत लढा देत होता, तेव्हा केजरीवाल यांनी उत्तर प्रदेशच्या लोकांना आणि कामगारांना दिल्ली सोडण्यास भाग पाडले.असे याोगी आदित्यनाथ ट्विटरच्या माध्यमातुन म्हणाले.

तिसऱ्य़ा ट्विटमध्ये योगींनी वीज आणि पाणि कनेक्शन तोडण्यात आले,झोपलेल्या लोकांना उठवुन बसमध्ये उत्तरप्रदेशच्या सीमेवर पाठवण्यात आले.आनंद विहारवरुन बस आहे, त्यापलिकडे युपी बिहारला जाण्यासाठी बस मिळेल,असे सांगितले.त्यानंतर उत्तरप्रदेश सरकारने प्रवासी मजदुरांना सुरक्षित घरी जाण्यासाठी मदत केली. असे म्हटले.

योगींच्या या ट्विटला अरविंद केजरीवाल यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ऐका योगी, तुम्हीच तर राहु द्या ज्याप्रकारे उत्तरप्रदेशच्या लोकांचे प्रेतं नदीत वाहत जात होती,तेव्हा करोंडोरुपये खर्च करुन टाईम्स मॅगजी्न्स मध्ये स्वत:ची जहिरात देत होतात.तुमच्यासारखा निर्दयी आणि कृर शासक मी पाहिला नाही,असं ट्विट उत्तर देताना म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशात निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत.

Tags:    

Similar News