जयंत पाटील यांनी मानले एकनाथ शिंदे यांचे आभार

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर स्थापन केलेल्या शिंदे फडणवीस यांच्या सरकारवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आधी मंत्रीमंडळ विस्तार आणि नंतर खातेवाटपावरून टीकेची झोड उठवली होती. मात्र आता जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

Update: 2022-08-14 16:45 GMT

राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून राष्ट्रवादीने टीकेची झोड उठवली होती. मात्र आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जोरदार टीकेची झोड उठवली होती. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रीमंडळाचा विस्तार आणि आता खातेवाटप केल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

जयंत पाटील सांगली येथे माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी खाते असणारे मंत्री ध्वजारोहण करतील. त्यामुळे या गोष्टीचे समाधान आहे. तसंच खातेवाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. त्यामुळे त्यात बोलता येणार नाही. तसंच ज्यांना जे खाते मिळाले आहेत. त्या खात्यांवर नवे मंत्री काम करायला सुरूवात करतील अशी अपेक्षा आहे. तर खात्यासहीत मंत्री आता महाराष्ट्रात काम करतील त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे आभार मानतो, अशी प्रतिक्रीया जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

तसंच पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे किती जणांची मनं सांभाळतील. त्यामुळे नाराज असलेल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे, अशी प्रतिक्रीया जयंत पाटील यांनी मंत्र्यांच्या खातेवाटपावर दिली.

Tags:    

Similar News