मी विधिमंडळाचा अवमान केला नाही - संजय राऊत

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी धुळवड संपताच पुन्हा एकदा आपली तोंडीची वाफ सोडायला सुरवात केली आहे. मी विधीमंडळाचा कोणत्याही प्रकारे अवमान केलेला नाही, असे संजय राऊत यांनी आज मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

Update: 2023-03-08 06:47 GMT

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मला हक्कभंगाची नोटीस मिळाली. नसल्याचे सांगितले आहे. तसेच मी त्यावेळी मुंबईत नव्हतो. त्यामुळे मी उत्तर देऊ शकलो नाही. म्हणून आज उत्तर देत असल्याचे राऊत यांनी सांगितले. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरू झालेले आहे. विधिमंडळातल्या (Legislature) सहकाऱ्यांशी मी चर्चा करेन आणि कशा प्रकारे आणि याची काय प्रोसेस आहे, ते पाहून त्या संदर्भात नक्की उत्तर देईन, असे संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

माझ्य़ावर हक्कभंग होईल, असे मी कोणतेही विधान केलेले नाही. एका विशिष्ट गटापुरते हे विधान मर्यादित असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. त्या विशिष्ट गटासंदर्भात जो 'चोर' हा शब्द वापरला तो त्यांच्यासाठी अतिशय योग्य असल्याचा निर्वाळा राऊत यांनी दिला. त्यामुळे मी विधिमंडळाचा (Legislature) अवमान केला नसल्याचे राऊत यांनी सांगितले. या देशातील परिस्थिती आणि राज्यातील परिस्थिती एकच आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल तर तुम्हाला देशद्रोही ठरवलं जातं. आणि अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही. या लोकांनी अतिशय बेकायदेशीरपणे शिवसेनेचे नाव आणि चिन्ह काढून घेतले असले, तरी शिवसैनिक लढतो आहे. काल सुद्धा लालू प्रसाद यादव ( Lalu Prasad Yadav) यांच्यावर धाडी पडल्या, मात्र गौतम अदानी (Lalu Prasad Yadav)) यांना साधी नोटीसही बजावण्यात आली नसल्याचे राऊत यांनी सांगितले आणि धाडी कोणावर टाकत आहेत तर विरोधी पक्षावर...पण आम्ही जे चुकीचे आहे त्याच्या विरोधात उभे राहणार, असल्याचे प्रतिपादन संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी केले.

देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनीच जनतेला भांग पाजली आहे? महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आले, हे जनतेला चांगलेच माहित आहे. त्यांची भांग उतरली की, त्यांची सत्ता नक्कीच जाईल आणि आम्ही पूर्ण शुद्धीत आहोत, असे राऊत म्हणाले. महाराष्ट्राची जनता किती शुद्धीत आहे हे कसब्याच्या निवडणुकीवरून स्पष्ट झाल्याचे राऊत म्हणाले. जे भांग पिऊन सत्तेवर बसलेले आहेत त्यांना कळेल की, महाराष्ट्र आणि राज्यातील जनता काय आहे आणि त्यांची सगळी भांग कसब्यामध्ये उतरली आहे. असे प्रतिपादन खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांशी बोलताना केले. 

Tags:    

Similar News