सरस्वती वक्तव्यावरून छगन भुजबळांविरोधात गुन्हा दाखल

Update: 2022-10-01 07:15 GMT

सत्यशोधक समाजाचा कार्यक्रम मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पार प़डला होता. त्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी सरस्वती देवी बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यासंदर्भात छगन भुजबळ यांच्याविरोधात मुंबईतील चेंबुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

छगन भुजबळ यांचा हा व्हिडीओ व्हाय़रल झाला आणि त्यावर बराच वाद निर्माण झाला होता. चेंबुर मध्ये राहणारे व्यापारी ललितचंद टेकचंदानी यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनंतर मला फोन करून धमकावलं गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे शिवाय जिवे मारण्याचा धमकी दिल्याची तक्रार देखील त्यांनी पोलिसांकडे नोंदवला आहे. छगन भुजबळ यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे दोन व्हिडीओ शेअर केल्यानंतर आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली गेल्याचे टेकचंदानी यांनी सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भुजबळ आणि इतर दोघांविरोधात कलम ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शिवाय पुढील तपास देखील सुरू केला आहे.

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले होते?

सत्य शोधक समाजाच्य़ा कार्यकेरमात बोलताना छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांचे फोटो लावावेत कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला आहे. शिवाय शाळेमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावला पाहिजे. महात्मा फुलेंचा लावला पाहिजे. "शाहू महाराजांचा फोटो लावा पाहिजे. बाबासाहेबांचा लावा फोटो. कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची?" असं वक्तव्य त्यांनी ,केलं होतं.

Tags:    

Similar News