ED कारवाईच्या धाकाने एकनाथ शिंदे यांचे बंड?

Update: 2022-06-23 07:07 GMT

बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackrey ) आणि उद्धव ठाकरे (Udhav Thackrey) यांचा अत्यंत निष्ठावान समजले जाणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि पक्षातील चाळीसच्यावर आमदारांनी बंड केले आहे. शिवसेनेसह(Shivsena) संपूर्ण राज्यासाठीही हा धक्का मानला जातो आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना भाजपने ED कारवाईचा धाक दाखवत फोडले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

पण या पार्श्वभूमीवर आता सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीवर EDने काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती, त्यामुळेच शिंदे यांना भाजपच्या दबावाखाली बंड करावे लागले का अशी चर्चा सुरू झाली आहे. या व्हायरल पोस्टमध्ये काय म्हटले आहे ते पाहूया...




 


"एकनाथ शिंदे यांचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे सचिव सचिन जोशी यांना दहा दिवसांपूर्वी EDची नोटीस आली होती. ही नोटीस आल्यापासून ते ठाण्यातून गायब आहेत. सचिन जोशी कुठे आहेत आणि त्यांना बजावलेल्या ईडीच्या नोटिशीचा एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी काय संबंध आहे, अशी चर्चा रंगली आहे" असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. एका वृत्तपत्रातील बातमीप्रमाणे ही पोस्ट आहे, पण हे वृत्तपत्र कोणते याची माहिती त्यामधून समजून येत नाहीये. पण ही पोस्ट व्हायरल झाल्याने आता एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आहे का अशीही चर्चा सुरू झाली आहे.

Tags:    

Similar News