संजय राऊत - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचे राईट हॅन्ड

आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि फडणवीस त्यांचे राईट हॅन्ड आहेत.एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला पुढे घेऊन जावं.अशी अपेक्षाही संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे .

Update: 2022-07-01 06:47 GMT

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आहेत . यावर समाजमाध्यमंतून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या .एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे इतर आमदार यांनी संजय राऊत यांच्यावरची नाराजी दाखवली होती. महाविकासघडीमद्ये काम करता येत नव्हतं अशी खंत एकनाथ शिंदे यांनी मांडली होती .या घडामोडींवर शिवसेनेचे संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे . महाराष्ट्राचा विकास व्हावा असं आम्हाला वाटत तसेच हे मोठे मन फडणवीसांनी अडीच वर्षापुर्वी दाखवलं असतं तर सुरुवातीला ते मुख्यमंत्री झाले असते.आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि फडणवीस त्यांचे राईट हॅन्ड आहेत.एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला पुढे घेऊन जावं.अशी अपेक्षाही संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे .

ईडीच्या चौकशी संदर्भात बोलताना त्यांनी मी एकटा समर्थ असल्याची भूमिका मांडली आहे .राजकीय नेत्यांच्या विरोधात जे बोलतात त्यांना दबाव आणण्यासाठी असं केलं जात हे जगाला आणि महाराष्ट्राला माहिती असल्याचंही संजय राऊत म्हणाले आहेत. मुख्यमंत्री जर सामान्य शिवसैनिकाला बनवलं असेल तर मग नारायण राणे यांना का नाही मुख्यमंत्री बनवले ?असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला .महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत . पण राजकारण सोयीनुसार आणि संधी साधून केलं आहे, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे काम ज्यांनी केल त्यांना मोदी यांनी मुख्यमंत्री केल.कारण जर हे काही वर्षांपूर्वी केल असतं तर हे झालं नसतं.असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे .

उपमुख्यमंत्री पदाच्या निर्णयाने देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीबद्दल बोलताना मी जोपर्यंत फडणवीस यांच्याशी बोलत नाही.तोपर्यंत ते नाराज आहेत असं बोलणार नसल्याचे ते म्हणाले .'या किंवा त्या कारणाने मुख्यमंत्री केले असं मी म्हणालो शिवसेना चा मुख्यमंत्री झाला असं नाही म्हणालो फ्लोअर टेस्ट बद्दल मी बोलणार नाही ते आमचे प्रतोद बोलतील किंवा सभापती बोलतील. पण जोपर्यंत ते स्वतः ला शिवसैनिक म्हणतील तोपर्यंत त्यांना मुख्यमंत्री पदावर बसवले जाईल.'असं खोचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे .

Full View
Tags:    

Similar News