नारायण राणेंमुळे मोदी आणि उद्धव ठाकरेंची बोलणी थांबली?

Update: 2022-08-05 11:53 GMT

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर काही महिन्यांनी उद्धव ठाकरे यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी केली होती, असा दावा शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात युतीची बोलणी झाली होती आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारीही केली होती, पण त्याच दरम्यान भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन झाले आणि भाजपने बोलणी थांबवली, असेही केसरकर यांनी सांगितले आहे.

एवढेच नाही तर त्यानंतर भाजपने नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद दिले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही युतीची बोलणी बंद केली, असाही दावा दीपक केसरकर यांनी केला आहे. त्याचबरोबर बंडानंतर एकनाथ शिंदे यांना बाजूला केले तर इतर आमदार आणि भाजपसोबत समेट करण्याची उद्धव ठाकरे यांनी दाखवली होती, असाही दावा केसरकर यांनी केला आहे.

Tags:    

Similar News