द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती, यशवंत सिन्हा पराभूत

Update: 2022-07-21 14:45 GMT

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी विजय मिळवला आहे. त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत, तर पहिल्या आदिवासी राष्ट्रपती म्हणून देखील त्यांच्या नावाची नोंद झाली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यापेक्षा मोठी आघाडी घेत द्रौपदी मुर्मू यांनी विजय मिळवला आहे. मुर्मू यांना २१६१ मत मिळाली या मतांचं मूल्य ५ लाख ७७ हजार ७७ एवढे आहे. तर यशवंत सिंन्हा यांना १ हजार ५८ मतं मिळाली आहेत. या मतांचं मूल्य २ लाख ६१ हजार ६२ एवढी मतं पडली आहेत.

दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू झाली तेव्हा पहिल्या १० राज्यांमधील मतांची मोजणी करण्यात आली आहे. यामध्ये अल्फाबेटिकली राज्यांची मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत भाजपतर्फे द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर विरोधकांच्या आघाडीतर्फे यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासी नेत्या असल्याने अनेक पक्षांनी त्यांच्या नावाला पाठिंबा जाहीर केला होता. यामध्ये उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेतर्फे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. भाजपकडे असलेली मतं आणि इतर पक्षांनी दिलेला पाठिंबा या पार्श्वभूमीवर द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जातो होता.

Tags:    

Similar News