अडीच वर्षे मला संपवण्याचा प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीस यांचे मोठं वक्तव्य

गोरेगाव येथील नेस्को पार्क येथे झालेल्या मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक शेवटची असेल असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Update: 2022-09-22 15:32 GMT

उध्दव ठाकरे यांनी गोरेगाव येथील नेस्को पार्क येथे बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ही आपल्यासाठीची शेवटची निवडणूक आहे, असा विचार करून निवडणूक लढवण्याचे आवाहन केले. यावरून उध्दव ठाकरे यांनी ही देवेंद्र फडणवीस यांची शेवटची निवडणूक असेल, असं वक्तव्य केलं. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुद्दई लाख चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में होता है. एवढंच नाही तर तुम्ही तिघांनी मिळून 2019 मध्येही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. गेल्या अडीच वर्षात तिघांनीही मला संपवण्याचा प्रयत्न केला. पण ते मला संपवू शकले नाहीत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर पलटवार केला.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उध्दव ठाकरे यांचे भाषण म्हणजे निराशेचे अरण्यरुदन होते. आम्हाला तर लोकांनी निवडून दिलं आहे. जेव्हा तुम्ही आमच्यासोबत निवडून येऊन त्यांच्यासोबत गेला होतात, त्यावेळी तुम्ही राजीनामे का दिले नाहीत? तेव्हा का निवडणूका घेतल्या नाहीत? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.


Tags:    

Similar News