हिंमत असेल तर एकत्रित निवडणूका घेऊन दाखवा, उध्दव ठाकरे यांच्या आव्हानाला देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी भाजपला एकत्रित निवडणूका घेण्याचे आव्हान दिले होते.

Update: 2023-02-13 05:00 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग दुसऱ्या दौऱ्यानंतर मुंबई महापालिका निवडणूकीची चर्चा सुरु झाली आहे. त्यातच हिंमत असेल तर एकत्रित निवडणूका घेऊन दाखवा, असं आव्हान उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई महापालिका निवडणूकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महिनाभरात दोन मुंबई (Mumbai) दौरे केले. त्यावरून विरोधी पक्षांनी ही मुंबई महापालिका निवडणूकीची तयारी असल्याचे सांगत टीकास्र सोडले. त्यातच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंमत असेल तर एकत्रित निवडणूका घेण्याचे आव्हान भाजपला दिले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर देतांना म्हटले की, यामध्ये हिंमतीचा काहीही भाग नाही. कारण निवडणूका या भारतीय संविधानानुसार होत असतात. मात्र उध्दव ठाकरे हे मोठे नेते झाले आहेत. विरोधी पक्षांना एकत्रित करीत आहेत. त्यामुळे त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करून वन नेशन, वन इलेक्शनसाठी (One Nation, One Election) पंतप्रधान मोदी यांची भेट घ्यावी. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधाची वन नेशन, वन इलेक्शनचा नारा दिला आहे.


Tags:    

Similar News