मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापुर्वी एकनाथ शिंदे यांचं ट्वीट

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यापुर्वी त्यांनी ट्वीट केलं आहे.;

Update: 2022-06-30 12:40 GMT

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर ठाकरे सरकार अल्पमतात आले होते. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उध्दव ठाकरे यांना बहुमताची चाचणी कऱण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. परंतू सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिल्याने उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची चर्चा सुरू होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरस्ट्रोक देत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं जाहीर केलं आहे. तर आज रात्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यापुर्वी एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असं जाहीर केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून भावना व्यक्त केल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, हा वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा विजय…! महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटीबध्द आहे असं ट्वीट केले आहे. तसंच पुढे या ट्वीटमध्य़े पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा, देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांचे मनःपूर्वक आभार असं म्हटलं आहे.

Full View
Tags:    

Similar News