दिल्लीः महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा का आहे?

Update: 2022-01-19 06:15 GMT

राजधानी दिल्लीत आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे. ओबीसी आरक्षणासह १२ निलंबित आमदारांच्या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज दिल्लीत घडणाऱ्या घटनेकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

ओबीसी आरक्षणः

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये असलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्दबातल ठरवले आहे. ओबीसी प्रवर्गाचा इम्पिरिकल डेटा गोळा केल्यानंतरच त्यांना राजकीय आरक्षण देण्यात यावे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाविरोधात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात आज 12 आमदाराच्या निलंबन प्रकरणी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातूल न्यायमूर्ती खानविलकर न्यायमूर्ती, सिटी रविकुमार आणि न्यायमूर्ती माहेश्वरी या तीन सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी होणार असून यामध्ये राज्य सरकारच्या वतीने याचिकेच्या संदर्भात युक्तिवाद पूर्ण झालेला असून यावर आता आमदारांचे वकील प्रतिवाद करणार आहे. आज याप्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक.

आज सकाळी या बैठकीला 10 वाजता सुरूवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पडत आहे. आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोबतच आर्थिक विषयक समितीची देखील बैठक होणार असल्याने या बैठकीकडे विशेष लक्ष लागले आहे.

काँग्रेस भाजपच्या शिर्ष नेतृत्वाची बैठक

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यांवर आज काँग्रेस आणि भाजपची निवडणूक समितीची बैठक होणार आहे. आज सकाळी 11 वाजता या बैठकांना सुरूवात होणार आहे. भारतीय जनता पक्षाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणार आहे या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह निवडणूक समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहे.

तर काँग्रेस पक्षाची बैठक सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी होणार आहे. या बैठकीत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

Tags:    

Similar News