फाळणीच्या वेदना जागवून काय होणार? ; सामनाच्या रोखठोकमधून सवाल

फाळणीचा दिवस विसरू नका,’ असं देशाचे पंतप्रधान मोदींनी म्हणत असताना,फाळणी करून तुटलेल्या पाकिस्तानातील 11 कोटी मुसलमानांचे काय करणार? त्यावर पंतप्रधानांनी भाष्य करावं, असं सामनामधून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Update: 2021-08-22 05:33 GMT

मुंबई :'फाळणीचा दिवस विसरू नका,' असं देशाचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. पण आज फाळणीच्या वेदना जागवून काय होणार?ती वेदना आता कशी शांत होणार?,असा सवाल सामनाच्या रोखठोकमधून उपस्थित करण्यात आला आहे.

पंतप्रधानांना अखंड राष्ट्र करायचे असेल तर त्याचे स्वागतच आहे. मात्र फाळणी करून तुटलेल्या पाकिस्तानातील 11 कोटी मुसलमानांचे काय करणार? त्यावर पंतप्रधानांनी भाष्य करावं, असं सामनामधून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांनी देशाला आणखी एक नवा कार्यक्रम दिला.तो म्हणजे 14 ऑगस्ट हा फाळणीचा स्मृती दिवस पाळा. एकीकडे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करायचा आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी 14 ऑगस्टला फाळणीच्या दुःखद आठवणींना उजाळा द्यायच्या. एखाद्या देशाचे अखंडत्व संपण्याच्या वेदना काय असतात ते अवघ्या जगाने अफगाणिस्तानात अनुभवले आहे. असं राऊत यांनी सामनातून म्हटले आहे.

Tags:    

Similar News