'पंजाबमधील भांगड्यामागचे ढोलवादक भाजपचे कलाकार होते'; सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्र

Update: 2021-10-21 03:43 GMT

मुंबई : पंजाब विधानसभेच्या आगामी निवडणुकांमध्ये आपल्यासोबत युती करण्याच्या माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या सूचनेचे भाजपाने काल स्वागत केले.अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नवीन पक्षाची घोषणा केली आणि भाजपासोबत जाण्यासंदर्भात संकेत दिले, त्यावरून शिवसेनेने अमरिंदर सिंग यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सोबतच पंजाबमधील राजकीय गोंधळामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असून राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांनी पंजाबमधील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हे सारं घडवून आणल्याचे शिवसेनेनं म्हटले आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने पंजाबमधील राजकीय गोंधळावर भाष्य करत "पंजाबचे 'पायउतार' मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर यांनी आता नव्या पक्षाची घोषणा केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कॅ. अमरिंदर यांना 'चावी' भाजपमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न करत असतील तर हे राजकारण त्यांच्यावरच उलटेल" असं सामानातून म्हटले आहे.

सोबतच सामानातून कॅ. अमरिंदर यांच्यावर टीकास्त्र सोडताना म्हटले आहे की कॅ. अमरिंदर हे कालपर्यंत काँग्रेस पक्षाचे पंजाबातील महत्त्वाचे शिलेदार होते. अनेक वर्षे ते काँग्रेसच्या माध्यमातून सत्तेचा लाभ घेत आहेत. भोगी व ऐयाशी अशी त्यांची प्रतिमा असताना देखील काँग्रेसने त्यांना अनेक वर्षे सांभाळले. काँग्रेस पक्षातच त्यांच्या विरोधात नाराजी झाली. अखेर 'पतियाळा महाराज' म्हणजे कॅ. अमरिंदर यांचा राजीनामा राहुल गांधींनी घेतला. यात त्यांचा असा काय अपमान झाला? पण आपला अपमान झाला असे म्हणत त्यांनी जो भांगडा सुरू केला, त्या भांगड्यामागचे ढोलवादक अर्थात भारतीय जनता पक्षाचे कलाकार होते हे आता स्पष्ट झाले," अशी टीका 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News