भारत जोडो यात्रेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे देखील सहभागी होणार?

Update: 2022-10-25 11:42 GMT

भारत जोडो यात्रेचा प्रवास संपूर्ण राज्यभर होत असताना ही यात्रा महाराष्ट्रात कधी पोहचणार याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचं लक्ष लागले आहे. याची अधिकृत माहीती काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिली. सर्वप्रथम भारत जोडो यात्रा (Bharat jodo yatra) ही नांदेड येथे ७ नोव्हेंबरला दाखल होणार आहे.

या यात्रेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यात्रेत सहभागी होणार आहेत. त्याचंबरोबर महाविकास आघाडीचे इतर नेते देखील उपस्थित राहणार आहेत तसेच उद्धव ठाकरे उपस्थित राहून भारत जोडोचे शक्तीप्रदर्शन करण्यास त्यांचा महत्वाचा सहभाग असणार आहे. अशी माहिती जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

महाराष्ट्राच्या भारत जोडो यात्रेत बेरोजगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या बाबतीत महत्त्वाचे प्रश्न, वाढती महागाई, यांसारख्या विषयांवर राहुल गांधी (Rahul Gandhi) महत्त्वाचे मुद्दे मांडून जनतेला संबोधित करणार आहेत. या यात्रेचा ४८ वा दिवस असून १८ जिल्ह्यातून हि यात्रा गेली आहे.

महाराष्ट्रात ही यात्रा १६ दिवस चालणार आहे. त्यामुळे या यात्रेचा इतर राजकीय पक्षावर त्याचा काय परिणाम होणार हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags:    

Similar News