सभा रद्द करुन राहुल गांधी विदेश दौऱ्यावर

Update: 2021-12-31 07:35 GMT

पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या कॉंग्रेसला शेतकरी आंदोलनाचा फायदा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात असताना कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद अजून मिटलेला नाही. त्यातच दुसरीकडे भाजप नेते विविध राज्यात दररोज सभा घेत असताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली नियोजीत सभा रद्द करुन विदेश दौऱ्यावर गेले आहेत.

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ३ जानेवारीला मेगा रॅली आयोजीत केली होती. काँग्रेस खासदार राहुल गांधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, आता काँग्रेस नेते राहुल गांधी परदेशात गेल्याचे वृत्त समोर आल्यानंतर प्रदेश काँग्रेसने ही रॅली रद्द केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाच्या 137 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर बुधवारी राहुल गांधी परदेश दौऱ्यावर गेले. राहुल गांधी नवीन वर्ष इटलीमध्ये आपल्या आजीसोबत साजरे करणार आहेत.

काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही राहुल गांधी परदेशात दौऱ्यावर असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांना राहुल गांधी परदेश दौऱ्यावर असल्याचे माहिती नव्हते. त्यामुळे ते पंजाबमध्ये रॅलीची तयारी करण्यात व्यस्त होते. मात्र, विरोधकांनी जेव्हा राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा अनेक कॉंग्रेस नेत्यांना राहुल गांधी परदेश दौऱ्यावर असल्याचं समजले.

Tags:    

Similar News