40 वर्षावरील महिलांनाच आवडतात मोदी... काँग्रेस नेते द्विग्विजय सिंह यांचे वादग्रस्त वक्तव्य

Update: 2021-12-26 11:36 GMT

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कायम चर्चेत असलेले मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते द्विग्विजय सिंह हे एका वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी चर्चेत आले आहेत. ते प्रियंका गांधी-वाड्रा यांनी सुरू केलेल्या लडकी हूँ, लढ सकती हूँ या थीमवर बोलत होते यावेळी द्विग्विजय सिंह यांनी 40 वर्षावरील महिलांनाच मोदी आवडतात, असे वादग्रस्त वक्तव्य केले. ते मध्यप्रदेशातील भोपाळ येथे एका कार्यक्रमाला संबोधित करत होते.

उत्तरप्रदेश निवडणूकीच्या निमीत्ताने काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी लडकी हु, लढ सकती हुं, असे अभियान सुरू केले आहे. या थीमवर बोलताना काँग्रेस नेते द्विग्विजय सिंह म्हणाले की, जीन्स घालणाऱ्या आणि फोन वापरणाऱ्या मुलींना मोदी आवडत नाहीत. तर 40 ते 50 या वयोगटातील महिलांवर मोदींचा प्रभाव आहे. त्यामुळे 40 ते 50 वयोगटातील महिलांना मोदी आवडतात. पण 2024 मध्ये भाजपा पुन्हा जिंकल्यास भारतीय राज्यघटना बदलली जाईल. याबरोबरच आरक्षणही संपुष्टात येईल, असे सिंह म्हणाले.

द्विग्विजय सिंह यावेळी म्हणाले, इथे हिंदू गोमांस खातात आणि म्हणतात कुठे लिहीले आहे गोमांस खाऊ नये. तर बहुतेक हिंदू हे गोहत्येच्या विरोधात आहेत. स्वतः सावरकर, सावरकरांबद्दल भाजपाकडून बरंच सांगितले जाते. मात्र सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहीले आहे की, गाय ही स्वतःच्या शेणात लोळण घेते. मग काय कशी काय माता होऊ शकते? गायीचे मांस खाण्यात काहीही चुकीचे नाही. तर हिंदू आणि हिंदुत्वाचा काही एक संबंध नाही, असेही वक्तव्य द्विग्विजय सिंह यांनी केले. तर ही सर्व वाक्ये सावरकरांची आहेत, यातील एकही वाक्य माझ्या मनाचे नाही, असे द्विग्विजय सिंह यांनी सांगितले. 

Tags:    

Similar News