भाजपमुळेच मुख्यमंत्री शिंदे येणार अडचणीत?

Update: 2023-02-26 05:54 GMT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूर येथील भूखंड घोटाळ्याच्या आरोपानंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर वांद्रे येथील अंदाजे एक हजार कोटी रुपयांच्या 36 एकर भूखंडाचा घोटाळा झाल्याचा आरोप करत भाजप आमदार आशिष शेलार यांनी गेल्या वर्षी जनहित याचिका दाखल केली होती. याच शेलार यांच्या याचिकेवर किरण फाटक या व्यक्तीने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री असताना मुंबईतील वांद्रे येथील अनाथालयाच्या ट्रस्टची मालमत्ता अनारक्षित केली गेली होती. विश्वस्तांनी धर्मदाय आयुक्त यांची परवानगी नसताना के.बी. के रियल वाणिज्य विकासासाठी विकली असा आरोप करत किरण फाटक यांनी आमदार आशिष शेलार यांच्या मूळ जनहित याचिकेत हस्तक्षेप करणारी याचिका दाखल केली आहे.

तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात वांद्रे येथील अंदाजे एक हजार कोटी रुपयांच्या 36 एकर भूखंडाचा घोटाळा झाल्याचा आरोप करत भाजप आमदार आशिष शेलार यांनी गेल्या वर्षी जनहित याचिका दाखल केली होती. मात्र नंतर राज्यात सत्तांतर झाले आणि शिंदे व भाजपचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर हे सर्व प्रकरण शांत झालं. शेलार यांनी कथित घोटाळ्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रचंड नुकसान होणार असल्याचा दावा त्यावेळी केला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा किरण फाटक या व्यक्तीने या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे म्हणून Adv. असीम सरोदे, Adv. मीनल चंदनांनी, Adv. गौतम कुलकर्णी, Adv. अभिजीत घुले पाटील यांच्यामार्फत हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.

Tags:    

Similar News