मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात त्यांच्याच नावाने उभारण्यात आलेल्या उद्यानाचे उद्घाटन करणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आमने-सामने येणार आहेत.

Update: 2022-08-02 05:06 GMT

हडपसर येथील उद्यानाचे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केली आहे. दरम्यान, शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मोठी फुट पडली आहे. राज्यात राजकीय वातावरण चांगलेच पटले आहे. शिंदे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार एकमेकांवर टीका करत आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यभरात शिव संवाद यात्रा, निष्ठा यात्रा करत आहेत.

या यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करत आहेत. अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आमने-सामने येणार आहेत.

Full View

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. एकनाथ शिंदे सकाळी पुण्यातल्या कात्रज चौकामध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. त्याचवेळी आदित्य ठाकरे हे कात्रजमध्ये शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे. त्याचवेळी शिंदे आज पुण्यात त्यांच्याच नावाने उभारण्यात आलेल्या उद्यानाचे उद्घाटन करणार आहेत. मात्र हे नामकरण नियमबाह्य असल्याचा आरोप होत आहे. मनपाच्या जागेवर हडपसर भागात हे उद्यान उभारण्यात आले आहे. शिंदे समर्थक माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचं नाव दिले आहे. जागा मनपाची असली तरी त्यासाठीचा खर्च आपण केल्याचा दावा भानगिरे यांनी केला आहे. पण नामकरणाला प्रशासकीय मान्यता नाही. याच परिसरात उभारण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाचे उदघाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाबाबतही प्रशासन अनभिज्ञ आहे. महापालिकेच्या प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ प्रशासनाच्या माध्यमातून आयोजित होणे अपेक्षित आहे. मात्र माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी स्वतःच दोन्ही कार्यक्रमांचा आयोजन केले आहे. त्यामुळे त्यावर टीका होत आहे. आदित्य ठाकरे कोल्हापूरमार्गे पुण्यात दाखल होत असून ते सातत्यांने बंडखोरांचा उल्लेख गद्दार म्हणून करत असून शिंदे फडणवीस सरकार कोसळणार असा दावा करत आहेत.

Tags:    

Similar News