चरणजीत सिंह चन्नी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, राहुल गांधी यांची उपस्थिती

Update: 2021-09-20 06:23 GMT

पंजाबचे नवीन मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे. गेल्या दोन दिवसांच्या राजकीय उलाढालीनंतर आज चरणसिंह चन्नी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी देखील उपस्थित होते.

चन्नी व्यतिरिक्त सुखजिंदर सिंह रंधावा आणि ओम प्रकाश सोनी यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत, पंजाब कॉंग्रेस चे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि इतर मंत्री आणि काँग्रेसचे आमदारही कार्यक्रमाला उपस्थित होते.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. त्यानंतर चरणजीत सिंह चन्नी यांचं नाव फायनल करण्यात आलं होतं.

Tags:    

Similar News