उध्दव ठाकरे बावचळलेल्या मनःस्थितीत, चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल

Update: 2022-10-05 07:29 GMT

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक जिंकणारच, असा दावा शिवसेनेने केला आहे. त्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीची घोषणा झाली. त्यामुळे शिवसेना विरुध्द भाजप असा संघर्ष रंगणार आहे. त्यातच शिवसेनेने ऋुतूजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी देत जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यापार्श्वभुमीवर उध्दव ठाकरे यांनी ही निवडणूक जिंकण्याचा चंग बांधला आहे. त्यावर बोलताना उध्दव ठाकरे हे बावचळलेल्या मनःस्थितीत असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

राज्यातील सत्ता गेल्याने उध्दव ठाकरे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे ते अशा पध्दतीने बोलत आहेत. मात्र अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपचा ऐतिहासिक विजय होणार आहे. तसेच यानंतर शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणूकीसाठी उमेदवारही मिळणार नाहीत, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

Tags:    

Similar News